मंगळवार, 19 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

परवेझ मुशर्रफांच्या घराजवळ आढळली स्फोटके

WD
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या घराजवळ स्फोटके आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पिस्तूल आणि डिटोनेटरची पाच पॅकेट्स आढळून आली आहेत. मुर्शरफ यांना ज्या मार्गावरून कोर्टात नेण्यात येणार होते, तिथे ही स्फोटके सापडली. सुरक्षेच्या कारणावरून मुशर्रफ यांना या दिवशी कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. चाक शाहजाद फार्महाऊसजवळ पार्क रोडवर स्फोटके सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गेल्या 24 डिसेंबर रोजी ही स्फोटके हस्तगत करण्यात आली. प्रत्येक पॅकेटमध्ये साधारण 400-500 ग्रॅम स्फोटके होती. मुशर्रफ यांना या दिवशी राष्ट्रद्रोह, न्यायाधीशांना ताब्यात घेणे आणि 2007 मध्ये आणीबाणी लादल्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मुशर्रफ यांना सुरक्षा कारणावरून हजर करता येत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी तेव्हा स्पष्ट केले होते. मुशर्रफ यांच्या निवासस्थानाजवळ दोन पिस्तूल, पाच मीटर डिटोनेटर वायर तसेच 16 गोळ्या आढळून आल्या. मुशर्रफ यांना 1 जानेवारीला कोर्टात हजर केले जाणार आहे.