शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: अलास्का , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:21 IST)

पर्यावरण संरक्षणासाठी ओबामा धावले

हवामान बदल आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ह्यास रोखण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सरसावले आहेत. त्यांना अलास्कातील हिमनदीला भेट देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
 
ओबामा मंगळवारी दक्षिण अलास्कातील केनई जोड्स अभयारण्यात गेले आणि एग्जिट हिमनदीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिले. ही हिमनदी आकसत चालल्याचा संदेश देणार्‍या फलकाकडे त्यांनी लक्ष वेधले. हिमनद्यांच्या आकसण्याची गती दरवर्षी वाढत आहे. हवामान बदलामुळे बर्फ कमी होत असून, उष्णता वाढत आहे.
 
तसेच उष्णतेचा कालावधीही वाढत चालला आहे. अभयारण्यातील झाडांवर याचा परिणाम झाला असून, बर्फ वितळल्यामुळे समुद्राचा जलस्तरही वाढू लागला आहे.
 
त्यामुळे पर्यावरणाचा ह्यास रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असा संदेश त्यांनी दिली.