शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकमधील जनता रस्त्यावर

श्रीनगर- भारतासह शेजारी देशांकडून होणारे दहशतवादाचे आरोप सातत्याने नाकारणार्‍या आणि उरी हल्ल्यानंतर जगभरात एकाकी पडलेल्या पाकिस्तानला घरातूनच दणका मिळाला. पाकिस्तान सरकार दहशतवाद पोसत असल्याचा आरोप करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांच्या विरोधात तेथील लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकमधील दहशतवाद्यांचे तळ बंद करा, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत.
 
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराराबाद, कोटली, चिनारी, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोर्‍यात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरलेले नागरिक सरकारविरोधी घोषणा देत आहेत.