शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मुझफ्फराबाद , शनिवार, 30 जुलै 2016 (12:15 IST)

पाकव्याप्त काश्मीरमध्ये शरीफविरोधात जनता रस्त्यांवर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नवाझ शरीफ यांच्याविरोधात उघडपणे घोषणा दिल्या जात असून, ठिकठिकाणी त्यांच्याविरोधी घोषणांचे पोस्टर्स, होर्डिंग्जही लावण्यात आली आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील रस्त्यारस्त्यांवर नवाझ शरीफ यांच्याविरोधात घोषणा दिल्या जात असून, घोषणा लिहिलेली पोस्टर्स आणि होर्डिंग्ज झळकत आहेत. असेंब्ली निवडणुकात आपल्याला बहुमत मिळाल्याचा दावा पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीगतर्फे केला जात असला तरी या पक्षातर्फे निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आणि त्यामुळेच त्या पक्षाला बहुमत मिळाल्याचे दिसत आहे, असा पाकव्याप्त काश्मीरमधील मतदारांचा आरोप आहे. तेथील जनता नवाझ शरीफ यांच्याविरोधात रस्त्यांवर आली असून, काही ठिकाणी तर पाकिस्तानचे झेंडेही पेटवून देण्यात आले आहेत.