शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (17:44 IST)

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफांविरोधात हत्येचा गुन्हा

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीफ यांच्याशिवाय त्यांच्या मंत्रिमंडळामधील अन्य मंत्री व काही अधिकार्‍यांचेही नाव आहे. इस्लामाबादमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणार्‍या आंदोलकांची हत्या करण्यात आल्यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्‍यात आलेल्याचे पो‍लिसांनी म्हटले आहे. 

दरम्यान शरीफ यांच्याविरोधातील हत्येची ही दुसरी तक्रार आहे. ही तक्रार नोंदविण्यासाठी पाकिस्तान आवामी तेहरिक पक्षाचे नेते मौलवी ताहिरुल काद्री यांनी कोर्टात धाव घेतली होती. 30 ऑगस्ट रोजी काद्री व तेहरिक-इ-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी शरीफ यांच्या निवासस्थानी चलण्याचे आवाहन केल्यानंतर झालेल्या संघर्षामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते.