शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 (12:50 IST)

पाकिस्तानने परत तोडला युद्धविराम, अंधाधुंध फायरिंग

पाकिस्तानी सेनेने सीमेवर आठवड्यापेक्षाही कमी वेळेत दुसर्‍यांदा  युद्धविरामाचा उल्लंघन केला आहे. जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टर मध्ये नियंत्रण रेषेजवळ पुढील पोस्टावर आज पाकने मोर्टार डागले आणि लहान शस्त्रांनी गोळीबारी केला.
  
संरक्षण प्रवक्ते यांनी सांगितले की पाकिस्तानी सैन्य बळांनी जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ अर्ध्या रात्री भारतीय सैन्य पोस्टावर बीन कुठल्याही कारणांनी अंधाधुंध गोळीबारी सुरू केली. प्रवक्तेने सांगितले की पाकिस्तानी सेनेने पुंछ सेक्टरमध्ये लष्करी छावण्यांवर भारी मोर्टार डागले आणि स्वचालित व लहान शस्त्रांनी गोळीबारी केली.  
 
त्यांनी म्हटले की आमची लष्करी शक्ती जश्यांस तसे करत आहे आणि शेवटीची रिपोर्ट येईस्तोवर आमच्या सैन्य बळांनी कुठलेही नुकसान झाल्याची सूचना दिलेली नाही आहे. गोळीबारी अजूनही सुरू आहे. तिकडे पोलिसांनी सांगितले की पुंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ शाहपुर कंडी भागात दोन्ही बाजूने गोळीबारी सुरू आहे.  
 
पाकिस्तानी सेनेने एक आठवड्याच्या आधीच दुसर्‍यांदा  युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. या अगोदर पाकिस्तानी सेनाने जम्मूचे अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन सप्टेंबरला अग्रिम सैन्य छावण्यांवर गोळीबारी करून  युद्धविरामाचा उल्लंघन केला होता. पाकिस्तानी सेनाने 14 ऑगस्ट, 2016ला देखील जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरच्या दोन वेगळ्या भागात नियंत्रण रेषेवर भारतीय छावण्यांना निशाना साधला होता आणि दोन वेळा युद्धविरामाचा उल्लंघन केला होता. या दरम्यान 50 वर्षीय एक महिला जखमी झाली होती.