बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (11:33 IST)

पाकिस्तानी कन्येने कंडोमची चोरी केल्याने खून

बर्लिन- पाकिस्तानी कन्येने घरातून कंडोमची चोरी केल्यामुळे चिडलेल्या वडिलांनी तिचा खून केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘लरीब खान असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
 
लरीबने मित्रासोबत फिरायला जाताना घरातून कंडोमची चोरी केली होती. तिचे वडील असुदुल्लाह खान यांनी कंडोमची चोरी करताना पकडले होते. यामुळे चिडलेल्या वडिलांनी तिला बेदम मारहाण केली. यावेळी तिची आई देखील उपस्थित होती. परंतु, तिने सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. मारहाणीमध्ये लरीब मृत्युमुखी पडली. या घटनेनंतर लरीबला एका मोटारीत घालून दरीत टाकून दिले होते.

असुदुल्लाह खान हे पाकिस्तानातील कुटुंबीय आहे. काही वर्षांपासून त्यांचे येथे वास्तव्य आहे‘. असे पोलिसांनी सांगितले. असुदुल्लाह खान म्हणाले ‘आमचे कुटुंबीय प्रतिष्ठित आहे. यापूर्वीही लरीबने कंडोमची चोरी केली होती. तिला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता‘.