शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

फिल्‍म फेस्‍टीवलची वेबसाईट हॅक

चीनच्‍या हॅकर्सनी एका ऑस्ट्रेलियन चित्रपट समारंभाची वेबसाइट हॅक केली असून या वेबसाइटवर राबिया कदीरच्‍या चित्रपटाच्‍या जागी चीनचा झेंडा आणि राबिया विरोधी स्लोगन लावले आहे.

मेलबोर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट समारंभाचे प्रमुख रिचर्ड मूर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार त्‍यांच्‍यावर राबियाच्‍या चित्रपटांना परवानगी नाकारण्‍याचे आणि राबिया यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्‍यासाठी चीनी अधिका-यांकडून सातत्‍याने दबाव येत आहे. त्‍यानंतर 10 दिवसांपूर्वीच समारंभाच्‍या वेबसाईवर हल्‍ले केले जात आहेत.