शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:25 IST)

बराक ओबामांनी भारताचे निमंत्रण स्वीकारले

प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहाणार आहेत. ओबामांनी भारताचे निमंत्रण स्विकारले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहावे असे निमंत्रण पाठविले होते. तसेच मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रात मैत्रिचे संबंध दृढ होत आहेत. 26 जानेवारी 2015 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्याने या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.