गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (15:29 IST)

बर्फाळ खड्डय़ाजवळ अखेर संशोधक पोहोचले..

संशोधकांचा एक चमू उत्तर सैबेरियातील एका भल्यामोठय़ा खड्डय़ाजवळ पोहोचला आहे. हा खड्डा 16  मीटर खोल आहे. रशियन सेंटर ऑफ  आर्टिक एक्सप्लोरेशनने हा चमू पाठवला आहे. 9 नोव्हेंबर रोजी तेथे उणे 12 अंश तापमान होते. तेथे पोहोचल्यानंतर संशोधकांनी खड्डय़ाची लांबी-रूंदी यांचे अध्ययन करून माहिती संकलित केली. रशियन सेंटरच्या हेड ब्लादिमीर पुश्कोरेव्हच्या मते थंडीमुळे परिसरातील सर्व प्रदेश गोठून गेला आहे. त्यामुळे संशोधकांना खड्डय़ाच्या तळापर्यंत जाणे शक्य झाले. खड्डय़ाच्या 10 मीटर खोलीपासून मोठा झरा असू शकतो, असा संशोधकांचा अंदाज आहे.