शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , सोमवार, 4 मे 2015 (12:04 IST)

बापरे...महाराष्ट्रातील तरुण ‘इसिस’मध्ये?

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना ‘टार्गेट’ केले जात असल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली आहे. याची शहानिशा करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)ने थेट अफगाणिस्तान सरकारशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे.
 
सुकामेवा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या एक अफगाणिस्तानी व्यापार्‍याकडून महाराष्ट्रातील  फूस लावून ‘इसिस’मध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा संशय एनआयए व्यक्त केला आहे. या व्यापार्‍याने कल्याणमधील चार युवकांना ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना पकडल्यानंतर बिंग फुटले. आता सबंधित व्यापारी फरार असून त्याची अधिक माहिती देण्याची विनंती करणारे पत्र न्यायालयामार्फत अफगाणिस्तान सरकारला पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.