शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: माल्टा , सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:43 IST)

बिनशर्त चर्चेची पाकची तयारी : शरीफ

भारत आणि पाकमध्ये शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. यासाठी आम्ही भारताशी विनाशर्त चर्चा करण्यास तयार आहोत, असे मत पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी व्यक्त केले आहे.
 
पाकचे पंतप्रधान शरीफ राष्ट्रकुल देशांच्या संमेलनासाठी माल्टात आले आहेत. राजधानी वालेटात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांची भारत-पाक संबंधांवर चर्चा झाली.
 
चर्चेदरम्यान शरीफ म्हणाले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत.