गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (14:10 IST)

बोईंग स्पेस टॅक्सीतून करा अंतराळ सफर

बोईंगने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासासाठी स्पेस टॅक्सी बनविण्याचे कंत्राट मिळविले आहे आणि या टॅक्सीतून अंतराळवीरांप्रमाणेच पर्यटकांनाही अंतराळातील स्पेस स्टेशनची सफर करता यावी यासाठीचा प्रस्ताव नासाला सादर केला आहे. जे पर्यटक अंतराळप्रवासासाठी उत्सुक असतील त्यांना साधारण 5 कोटी 20 लाख डॉलर्स भरून हा प्रवास करता येणार आहे.

बोईंगने स्पेस टॅक्सीसाठी पाच वर्षाचा करार नासाबरोबर केला असून त्यासाठी 4.2 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. बोईंगचे प्रोग्रॅम मॅनेजर जॉन मुलहॉलंड म्हणाले की आम्ही रशियन स्पेस एजन्सीप्रमाणेच पर्यटकांसाठीही ही राईड देण्याचा प्रस्ताव नासाला दिला आहे.

व्हर्जिनिया येथील स्पेस टूरिझम कंपनी रशियन सोयूझ कॅप्सूलमधून ब्रोकरना परदेशी जाण्यासाठी सेवा देत आहे. स्पेस अँडव्हेंचरला भविष्यात चांगले दिवस येणार याचे संकेत मिळत आहेत. स्पेस अँडव्हेंचरसाठी जानेवारीपासून पर्यटकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. बोईंगच्या स्पेस टॅकसीमधून अंतराळात जाण्यासाठी 2017 सालाची वाट पाहावी लागणार आहे.

ब्रिटिश गायिका सारा ब्राईटमन हिचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर 10 दिवस मुक्काम करण्यासाठीचे प्रशिक्षण सुरू केले गेले असून तिला या प्रवासासाठी 52 दशलक्ष डॉलर्स खर्च येणार आहे. असे प्रशिक्षण घेणारी ती आठवी प्रवासी ठरली आहे.