शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कराची , शनिवार, 16 जानेवारी 2016 (10:46 IST)

भारत अण्वस्त्रांच्या टप्प्यात : हाफिज सईद

पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या टप्प्यात भारत आहे, असा इशारा जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने दिला आहे.
पठाणकोट हल्ल्याशी संबंधितांवर कारवाई करण्याची भाषा पाकिस्तान करत असतानाचा दुसरीकडे हाफिज सईदने हा धमकीवजा इशारा दिला आहे. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही टीका केली आहे.
यापूर्वीही हाफीज सईदने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर व इतरांना ताब्यात घेतल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या सरकारवर टीका केली होती.

'भारताला खुश करण्यासाठीच पाकिस्तान सरकारने ही कारवाई केली आहे' असा आरोप त्याने केला होता.