गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

भारतीय वंशाचे सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ

WD
माहिती तंत्रज्ञानात संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणार्‍या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली. सत्या नाडेला हे मूळचे हैदराबाद येथील आहे. मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी नाडेला यांचे अभिनंदन केले आहे.

सत्या नाडेला हे 22 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत असून क्लाऊड कम्युटिंग विभागाचे उपाध्यक्ष आहेत. नाडेला यांनी आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट कंपनीत क्रांतीकारी बदल घडवले. त्यामुळे कंपनीला कोट्यवधींचा फायदा झाला. स्टीव्ह बाल्मर यांच्याकडून नाडेला पदभार स्विकारतील.