शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2015 (10:57 IST)

भूत! फक्त मेंदूचा खेळ

जगात खरोखरीच भुतांचे अस्तित्व आहे का, हे शोधण्यासाठी करण्यात आलेल्या एका प्रयोगादरम्यान हा केवळ मेंदूचा खेळ असल्याचे सिद्ध झाले आहे. मानवी मेंदूद्वारे केल्या जाणार्‍या विविध कल्पनांमुळेच त्याला अनेक प्रकारे भुतांच्या अस्तित्वाची अनुभूती होत असल्याचे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

यासाठी काही इच्छुक व्यक्तींवर करण्यात आलेल्या प्रयोगादरम्यान त्यांच्या होळ्यांवर पट्टी बांधून त्यांच्या मेंदूतून निघणार्‍या लहरींचा अभ्यास करण्यात आला. एक रोबोटद्वारे या लहरींची नक्कल करण्यात येऊन भुतांची कृत्रिम अनुभूती या प्रयोगादरम्यान करण्यात आल्याचे अभ्यासाचे प्रमुख संशोधक ओलाफ ब्लान्के यांनी सांगितले.

स्वित्झर्लंडमधील एक प्रयोगशाळेत हा प्रयोग करण्यात आला. मेंदूत होणार्‍या विविध क्रियांमुळेच भुतांची अनुभूती होत असल्याचे ओलाफ म्हणाले. प्रयोगादरम्यान जास्तच भुतांनी भराडा घातल्याची अनुभूती झाल्यावर घाबरलेल्या काही जणांनी तर मध्येच प्रयोग थांबविण्याची विनंती केल्याचेही ते म्हणाले. मेंदूद्वारे केल्या जाणार्‍या विचारांनुसार मानवाला विविध गोष्टींची अनुभूती होत असते. त्यामुळेच त्याला भुतांच्या अस्तित्वाचा भास होतो. मात्र प्रत्यक्षात भूत अस्तित्वात नसून हे केवळ मेंदूचे खेळ असल्याचे या प्रयोगादरम्यान सिद्ध झाल्याचे ओलाफ यावेळी म्हणाले.