बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (10:34 IST)

भोपाळ गॅस गळती : मुख्य आरोपी अँडरसन यांचे निधन

भोपाळमध्ये गॅस गळती दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसन यांचे निधन झाले. 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतून झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे 3 हजार 787 नागरिकांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यावेळी मध्य प्रदेश सरकारने दिली होती. या दुर्घटनेवेळी वॉरेन अँडरसन हा युनियन कार्बाईडचा प्रमुख होता.
 
कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तो अज्ञात ठिकाणी राहात होता. याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात कोर्टाने अँडरसनला फरार घोषित केले होते. भारत सरकारने त्याच्या हस्तांतरासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. अमेरिकेत फ्लोरिडातील व्हेरो बीच हॉस्पिटलमध्ये 29 सप्टेंबरला अँडरसनचे निधन झाले. पण त्याच्या कुटुंबीयांनी ही माहिती लपवून ठेवली होती.