शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

महात्मा गांधींच्या वस्तूंचा लिलाव!

WD
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 1948 मध्ये ज्या ठिकाणी हत्या झाली, त्याठिकाणचे गवत आणि मातीचा मंगळवारी लिलाव झाला. आठ लाख 19 हजार 130 रुपयांमध्ये या वस्तू विकल्या गेल्या. या वेळी गांधीजींच्या चिरपरिचित गोल चष्म्याचाही लिलाव झाला.

चष्म्याला जेवढी किंमत मिळणे अपेक्षित होते, त्यापेक्षाही दुप्पट किंमत मिळाल्याचे सांगण्यात आले. या चष्म्याला 27 लाख 85 हजार 211 रुपये एवढी किंमत मिळाली. तर, त्यांच्या चरख्याचा लिलाव 18 लाख 84 हजार 113 रुपयांमध्ये झाला. या वस्तूंची खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही आहे.