गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मॅनचेस्टर , गुरूवार, 21 मे 2015 (17:48 IST)

महिलाने आपल्या ब्रेस्टचा फोटो फेसबुकवर अपलोड केला

ब्रेस्ट कँसरशी पीड़ित महिलाने लोकांना ब्रेस्ट कॅन्सर माहितीसाठी एक मोठा पाऊल उचलला आहे आणि तिनी स्वत:च्या ब्रेस्टचा फोटो फेसबुकवर अपलोड करत लोकांना सांगितले की कॅन्सर ब्रेस्ट कसा दिसतो.  
 
या महिलेचे नाव रॉयल आहे आणि ती मॅनचेस्टर इंग्लँडची राहणारी आहे. रॉयलला नुकतेच डॉक्टरांनी सांगितले की तिला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि तिचे ऑपरेशन होणार आहे त्यानंतर तिचा ब्रेस्ट काढण्यात येईल.  
 
पण ऑपरेशनआधी तिला असं वाटत होते की जग भरातील महिलांना हे माहीत असायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर काय असतो. त्यासाठी तिने एक निर्भीक पाऊल उचलून ब्रेस्ट कॅन्सराशी पीडित आपल्या ब्रेस्टचा फोटो फेसबुकवर अपलोड केला. 
 
तिनी लिहिले आहे की मला हे कळले नाही की मला ब्रेस्ट कॅन्सर कसा झाला, माझ्या ब्रेस्टच्या खालच्या भागावर एक लहानशी गाठ याची ओळख आहे पण सामान्यरीत्या कॅन्सरला ओळखणे इतके सोपे नाही आहे.            
 
अमेरिकन सोसायटीने या संबंधांत चेतावणी दिली आहे की जर तुमच्या ब्रेस्टमध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही गाठ कॅन्सरची असू शकते. आणि बर्‍याच महिलांना या बाबत माहिती नसते.  
 
रॉयलने फेसबुकवर महिलांशी निवेदन करत लिहिले आहे की माझ्या ब्रेस्टला लक्षात ठेवून बघा हे तुमचे जीवन वाचवू शकते.  
 
रॉयलने जेव्हा ही पोस्ट फेसबुकवर अपलोड केली तेव्हा लाखो लोकांनी तिच्या या निर्भीकपणे उचललेल्या पाउलाची प्रशंसा केली आहे. आतापर्यंत तिच्या या पोस्टाला कई हजार लाइक व पोस्ट मिळाले आहे.  
 
18 मे रोजी तिच्या पतीने फेसबुकवर तिच्या पोस्टावर कमेंट केले आणि म्हटले की तिचे ऑपरेशन झाले आहे. (Photo courtesy  :  Facebook)