गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मुलंही येताहेत वेळेअगोदर वयात

FILE
वेळेअगोदर वयात येण्याची समस्या फक्त मुलींमध्येच नसून मुलंही त्यापासून सुटलेले नाहीत. मुलंसुद्धा निर्धारित वयापेक्षा जवळपास एक ते दोन वर्ष अगोदर वयात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नॉर्थ कॅरोलिना विश्वविद्यायाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी मर्सिया हर्मन गिडेन्स यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात वैद्यकीय मानकाच्या तुलनेत मुलं सहा महिने ते दोन वर्ष अगोदर वयात येत असल्याचे स्पष्ट झाले.

सीएनएन वाहिनीच्या वृत्तानुसार हर्मन गिडेन्स यांनी पहिल्यांदा १९९७ मध्ये मुली वेळेअगोदर वयात येत असल्याचे सांगितले होते.

मुलींमध्ये स्तनांचा विकास व मासिक पाळीची सुरुवात यामुळे किशोरावस्था प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. मात्र मुलांमध्ये हे जाणून घेण्यासाठी चाचण्या कराव्या लागतात. शुक्राणूंची निर्मिती व इतर गोष्टीतूनही हे स्पष्ट होते.