गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बँकाक , शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (13:37 IST)

मृत्यूनंतर लगेचच आत्मा शरीराच्या बाहेर उभी झाली (व्हिडिओ)

थायलँडच्या एका रस्त्यावर अपघात झाला आणि मरणार्‍या एका मुलीची 'आत्मा' लगेचच तिच्या मृत शरीरातून बाहेर येऊन उभी राहिली.  
 
हा अपघात रस्त्यावर लागलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे सोशल मीडियावर वायरल झाले आहे. आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.  
 
घटनेच्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे की एक वाहन रस्ता पार करत आहे आणि स्पीडमध्ये येणारी एक मोटरबाइक त्याला टक्कर मारते. मोटरबाइक चालवत असलेली मुलगी जागीच मरण पावते, तिची 'आत्मा' तिच्या मृत शरीराजवळ उभी राहते.  
 
अपघाताच्या वेळेस लोकांची गर्दी तिथे जमा होऊ लागते, पण ती 'आत्मा' तिथून सरकत देखील नाही पण काहीच वेळानंतर ती वार्‍यात अदृश्य होऊन जाते. बर्‍याच लोकांनी ह्या व्हिडिओची निंदा करत म्हटले आहे की हा व्हिडिओ नकली आहे आणि फोटोशॉपद्वारे यात छेडखानी करण्यात आली आहे. या व्हिडिओला सुटान्नाराज सुवान्नटाडाने पोस्ट केला आहे, ज्याला अद्याप चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.