गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मेडन , बुधवार, 1 जुलै 2015 (10:58 IST)

मेडन शहरात विमान कोसळून शंभरावर ठार

इंडोनेशियन हवाई दलाचे विमानास उड्डाणानंतर काही क्षणातच आग लागली. मोठा स्फोट होऊन हे विमान सुमात्रा बेटाजवळील मेडन शहरात कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातानंतर ११५ हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, हर्क्युलिस सी-१३० या विमानात १०१ प्रवासी आणि १२ विमान कर्मचारी होते. या सर्वांचाच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या जमिनदोस्त झाल्याने अनेक नागरिक ढिगाºयात अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातही अनेक वाहने भस्मसात झाली.