शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2015 (07:33 IST)

रशियन हॅकर्सकडून हिलरींचे खासगी ई-मेल 'हॅक'

रशियन हॅकर्सनी २0११ मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे खासगी ई-मेल्स तब्बल ५ वेळा हॅक करण्याचा प्रय▪केला होता, असा नवा खुलासा झाला आहे.
 
रशियन हॅकर्सनी ३ ऑगस्ट २0११ रोजी पहाटे १.४४ ते ५.२६ वाजेच्या सुमारास हिलरी क्लिंटन यांना त्यांच्या खासगी सर्व्हरवर ५ ई-मेल्स पाठविले होते. हे ई-मेल्स व्हायरसयुक्त होते. त्यामुळे त्यांच्यासोबत पाठविण्यात आलेली सामग्री हिलरी यांनी डाऊनलोड केली असती, तर त्यांच्या खासगी सर्व्हरमधील संवेदनशील माहिती जगभरातील ३ सर्व्हरवर गेली असती. यातील एक सर्व्हर रशियात होते. त्यामुळे परराष्ट्र मंत्रीपदी विराजमान असणार्‍या हिलरींसाठी सुरक्षा व गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून ही निश्‍चितच चिंताजनक बाब होती, असे सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे. हिलरींचे काही खासगी ई-मेल्स सरकारने बुधवारी सार्वजनिक केले. त्यातून हा खुलासा झाला आहे. 'न्यूयॉर्क स्टेट पार्किंग टिकेट'च्या आशयाखाली हे ई-मेल्स पाठविण्यात आले होते. या कृतीमागे निश्‍चितच रशियन हॅकर्सचा हात होता काय? हे सांगणे कठीण असले तरी तसे संकेत मिळत आहेत, असेही विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे. 
 
दरम्यान, काही ई-मेल्समध्ये हिलरी आपल्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत खासगी ई-मेल्सच्या वापराच्या धोक्यावर चर्चा करत असल्याचेही सरकारने जारी केलेल्या दस्तावेजांतून स्पष्ट होत आहे.