बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2015 (11:28 IST)

लाहोरमध्ये पाक-झिंबाब्वे सामन्या दरम्यान हल्ला, दोघांचा मृत्यू

पाकिस्तानचे सूचना मंत्री परवेझ रशीद यांनी म्हटले की गद्दाफी स्टेडियमजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात एका पोलिस अधिकारी समेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.  
 
हा स्फोट काल रात्री 9 वाजता जेव्हा पाकिस्तान आणि झिंबाब्वे दरम्यान डे-नाइट सामना सुरू होता.  
 
रशीद यांनी जियो न्यूजला सांगितले, कलमा चौकाजवळ हल्लाखोराला रोखण्याच्या प्रयत्नात एका पोलिस अधिकार्‍याने आपला जीव गमावला. त्या अधिकार्‍याच्या बहादुरीमुळे गद्दाफी स्टेडियमवर हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ झाला.  
 
गद्दाफी स्टेडियमहून एका किलोमीटरापेक्षा ही कमी अंतरावर कलमा चौकाजवळ ऑटो रिक्शेत एक स्वार आत्मघाती हल्लाखोराने विस्फोट केल्या ज्यात एक पोलिस उप निरीक्षक आणि एक व्यक्ती मरण पावला आहे.  
 
लाहोरचे पोलिस प्रमुख अमीन वेन्स यांनी म्हटले, एका ऑटो रिक्शेत ठेवण्यात आलेल्या गॅस सिलेंडरमध्ये विस्फोट झाला. विस्फोटात एका पोलिसकर्मी समेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात जखमी एक नागरिक आणि चार पोलिसकर्मचार्‍यांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाण्यात आले तेथे उप निरीक्षक आणि एका नागरिकाला मृत घोषित करण्यात आले.