शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: इस्लामाबाद , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (16:38 IST)

विरोधकांत निवडणूक बहीष्काबाबत एकमत नाही

परवेझ मुशर्रफांनी बडतर्फ केलेल्या न्यायमूर्तिंना परत सेवेत दाखल करून घेण्याच्या मुद्दयावर प्रमुख विरोधी पक्षांत एमकत झाले नसून आठ जानेवारीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सहभागी होण्याबाबत मतभिन्नता आहे.

मुशर्रफांनी गुरूवारी दुसर्‍यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ व जमात-ए-इस्लामी पक्षाने आणीबाणीदरम्यान बडतर्फ करण्यात आलेल्या नायमूर्तिंना सेवेत दाखल करून घेतल्याशिवाय निवडणूकीत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. मात्र माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोच्या पाकिस्तान पिपल्स पक्षाने सर्वपक्षीय लोकशाही चळवळींची निवडणूकीवर बहीष्कार घालण्याची मागणी फेटाळून लावली.

बेनझीर यांनी आपला पक्ष निवडणूकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. बहीष्कारातून काही फलनिष्पत्ती होण्याची शक्यता नसल्याचे त्या म्हणाल्या. सवौच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश इफ्तिखार मुहम्मद चौधरी यांच्यासहीत प्रमुख न्यायमूर्तिंना परत सेवेत दाखल करून घेण्याच्या महत्वपूर्ण मुद्दयावर शरीफप व भुत्तो यांच्यात एकमत होऊ शकले नाही. पाकिस्तानी जनतेसाठी स्वतंत्र न्यायापालिकेची आवश्यकता असून कुणी एक व्यक्ती महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.