मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (15:08 IST)

श्री.श्री रविशंकर यांची इराकमध्ये धाडसी भेट एर्बील

शांततागुरु म्हणून जगभरात ओळख असणारे आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते धर्मगुरु श्री. श्री. रविशंकर यांनी संघर्षग्रस्त भागात शांती प्रस्थापित करण्यासाठी कुर्दिस्तान मधील एर्बील या इराकमधील हिंसाचाराचे केंद्रस्थान असलेल्या ठिकाणी शांतता परिषदेत मनोगत व्यक्त केले. सहजीवन, करुणा आणि शांती प्रस्थापित करण्याची वचनबध्दता या गोष्टींवर भर देताना श्री श्री म्हणाले, जिथे शांतता असते तिथे शांतता परिषद भरविली जाते.
 
माला संघर्षग्रस्त भागातच परिषद भरवायची होती. एर्बीलच्या जवळील शेकडो, ख्रिश्चन, कर्द आणि अरब विस्थापितांचे सांत्वन करण्यासाठी श्री.श्री. रविशंकर यांनी निर्वासीत छावण्यांना भेट दिली.