गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

संसाराची दोरी 'स्त्री'च्याच हातात

'तारे जमीं पर' या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात एक गाणं आहे, 'दौडा दौडा भागा भागासा, वक्त ये सक्त है थोडा थोडा'. या गाण्यात एका आईची धावपळ दाखवण्याचा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियातील सांख्यिकी विभागानेही असाच प्रयत्न करून आईची धावपळ नेमकी किती होते, हे शोधले आहे. या सर्वेक्षणात संसाराचा गाडा चालविण्यात अजूनही महिलांचाच मोठा वाटा असल्याचे लक्षात आले आहे.

पुरुषांचा यात नाममात्र सहभाग असून, या महिला कार्यालयीन कामासह मुलांचे संगोपन आणि घराचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. 60 टक्के महिला या पार्टटाईम जॉब करून घरातही लक्ष घालतात, असे आढळून आले आहे.

पूर्णवेळ काम करणार्‍या महिला आठवड्यातील 18 तास तरी घराच्या स्वच्छतेत घालवत असल्याचे आढळून आले आहे.