गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पॅरिस , शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:24 IST)

सहवैमानिकानेच विमान कोसळविले?

जर्मन विंग विमानाच्या सहवैमानिकाने हे विमान मुद्दाम पर्वतामध्ये कोसळविले, असा दावा अपघाताच्या कारणांच्या तपासाशी संबंधित एका अधिकाºयाने केल्याने खळबळ उडाली आहे.
 
अपघातस्थळी ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्यावर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. अपघात झाला तेव्हा मुख्य वैमानिकाला कॉकपिटमध्ये येऊ दिले नाही तर यावेळी अँड्रियास ल्युबित्झ हा सहचालक एकटाच कॉकपिटमध्ये होता. त्याने आकाश स्वच्छ असतानाही विमान खाली घेण्यास सुरुवात केली होती. मुख्य वैमानिक आत येण्याचा प्रयत्न करत होता. अपघात होणार हे दिसत असताना प्रवासी किंचाळत होते, असे तपास अधिकारी ब्राईस रॉबिन यांनी सांगितले.
 
अँड्रियास ल्युबित्झ (२८) असे सहवैमानिकाचे नाव असून विमान खाली आदळेपर्यंत तो जिवंत होता, असे सबंधित अधिकाºयाने स्पष्ट केले आहे.