गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: दमिश्क , गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (15:33 IST)

सीरियातील शाळेत बॉम्बस्फोट, 48 जणांचा मृत्यू

सीरियाच्या होम्स शहरात एका शाळेवर झालेल्या बॉम्बस्फोटात 41 विद्यार्थ्यांसह 48 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी 12 वर्षे वयोगटातील आहेत. सीरिया ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने दिलेल्या माहितीनुसार, बशर सरकारच्या नियंत्रणात असणा-या शाळेच्या इमारतीत आत्मघातकी हल्लेखोराने हे दोन्ही स्फोट घडवून आणले. 
  
होम्स शहरातील अकराम अल-मख्जूमी शाळेत दोन स्फोटात जवळपास 41 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अनेक मुले अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता ऑब्झर्व्हेटरीचे डायरेक्टर रमी अब्दुल रहेमान यांनी वर्तवली आहे.
 
मृतांमध्ये चार नागरिक आणि तीन सैनिकांचा समावेश आहे. बशर समर्थक संघटनांनी फेसबूक आणि ट्वीटरवर स्फोटानंतरची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.