शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मोगदिशू , मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (09:19 IST)

सोमालियात अल-कायदाचा हल्ला ; 17 ठार

सोमालियामध्ये सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेच्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 17 जण ठार झाले असून तीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या अल-शबाब या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका आत्मघातकी हल्लेखोराने सोमालियामधील स्थानिक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवून आणला.