गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जुलै 2014 (11:00 IST)

सौदी अरबमध्ये कोट्यधीश भिकारी अटकेत

रियाद-सौदी अरबमध्ये पोलिसांनी एका भिकार्‍याला अटक केली. मात्र हा भिकार्‍याकडे कोट्यवधीशींची संपत्ती सापडली.  सौदी गजेटच्य अहवालानुसार, पोलिसांनी पश्चिम सौदी अरबमधील यान्बू येथून एका अरबी भिकारीला अटक केले. या व्यक्तीकडून सुमारे 1.92 कोटी रुपये रोख व काही किमती वस्तू जप्त केल्या. भिकारी वेगळे हावभाव करून भीक मागत  असल्याचे मदीना पोलिसांचे प्रवक्ता फहद अल-गानम यांनी सांगितले. विशेष म्हणजे सौदी अरबमध्ये भीक मागण्यावर  बंदी घालण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आलिशान अपार्टमेंटमध्ये हा व्यक्ती राहात होता. दुसर्‍या शहरात जाण्‍यासाठी  आपली लक्झरी कारचा वापर करत होता. भीक मागण्‍याच्या कामात त्याला पत्नी आणि तीन मुले मदत करत असल्याचे  चौकशीत त्याने सांगितले. भिकारी आणि त्याचे कुटूंब सौदी अरबमध्ये बेकायदा राहत असल्याची माहिती देखील समोर  आली आहे.