गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: दुबई , मंगळवार, 17 मार्च 2009 (11:19 IST)

सौदी अरेबियात रोज ७८ तलाक

सौदी अरेबियात रोज ३५७ विवाह होतात. पण रोज ७८ काडीमोडही होतात.

कायदा मंत्रालयाच्या एका ताज्या अहवालात ही माहिती पुढे आली आहे. तलाकच्या २८ हजार प्रकरणांपैकी २५ हजार ६९७ प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही सौदी अरेबियाचे होते, असेही यात आढळले आहे. इतर प्रकरणात दाम्पत्यापैकी एकच जण सौदीचा होता.

मक्केत सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ७०२ लग्ने झाली. पण ८३१८ तलाकही झाले. रियाधमध्ये २८ हजार २८९ लग्ने झाली, पण ९२९३ तलाक झाले.