गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रियाध , शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (11:11 IST)

सौदीत भारतीय महिलेचे हात कापले

वेळेवर पगार मिळत नाही, तसेच छळ होत असल्याची तक्रार करणार्‍या आणि  पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या   मोलकरणीचे सौदी अरेबियात मालकाने हात कापण्याचा प्रकार घडला आहे. ही मोलकरीण भारतीय असून या घटनेचा भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

कस्तुरी मणिरत्नम (५०) असे पीडित महिलेचे नाव असून ती मूळची तामिळनाडूतील आहे. तिच्यावर सध्या रियाधमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालक वेळेवर पगार देत नाही, तसेच आपला छळ करतो, अशी तक्रार तिने दिली होती. त्यानंतरराच्या बाल्कनीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या मालकाने तिचा उजवा हातच कापून टाकला. हा प्रकार पाहून तेथील शेजा-यांनी इतरांच्या मदतीने कस्तुरीला रुग्णालयात दाखल केले.