शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: एडिंगबर्ग , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (10:52 IST)

स्कॉटलंडचे आज भवितव्य ठरणार, कॅमेरॉन यांच्यावर दबाव

ब्रिटनमध्ये राहायचे की स्वतंत्र व्हावयाचे यासाठी सुमारे 307 वर्षांचे संबंध संपुष्टात आणत गुरुवारी स्कॉटलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. आज (शुक्रवारी) सकाळी सार्वमताचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
 
साधारण 40 लाख लोकसंख्येपैकी 97 टक्के नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. 
 
आपापल्या पर्यायाबाबत लोक भावूक होऊन मत व्यक्त करत होते. या निर्णयाचा दूरगामी परिणाम माझ्या मुलांच्या भवितव्यावर होणार असल्याचे ३४ वर्षीय चार्लोट फािरश या महिलेने सांिगतले. मुलांना शाळेत सोडण्यापूर्वी कार्यालयात जाण्याआधी तिने मतदानाचा हक्क बजावला. मागील काही जनमत सर्वेक्षणांत लोकांनी स्वतंत्र होण्यात उत्सुकता दाखवली आहे.
 
'आमचे भवितव्य आमच्या हातात घेऊ. भरभराटीची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासोबत नि:पक्ष समाजनिर्मिती करण्याची आपणास संधी प्राप्त झाली आहे, असे सालमंड यांनी मतदानानंतर सांगितले.