शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: ग्लासगो , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (14:36 IST)

स्कॉटलॅंड ग्रेट ब्रिटनचाच भाग, राष्ट्रीय एकतेचे दर्शन-कॅमरन

'स्कॉटलँड'ला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा, यासाठी ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यादा मोठ्या प्रमाणात जनमत चाचणीचा आधार घेण्यात आला. परंतु देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. त्यामुळे आपण खूप आनंदी असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरन सांगितले. 
 
स्कॉटलँडला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देऊ नये, याबाजूने 55 टक्के लोकांनी मतदान केले. यावरून स्कॉटलँड हे ब्रिटनमध्येच राहाणार आहे. 45 टक्के लोकांना स्कॉटलॅंड हा देश स्वतंत्र हवा असल्याचे मत नोंदवले.
 
'स्कॉटलॅंड' हा स्वतंत्र देश व्हावा की ग्रेट ब्रिटनमध्येच राहावा, यासाठी गुरुवारी जनमत चाचणी घेण्यात आली होती. नंतर आज (शुक्रवार) सकाळी मतमोजणी झाली. स्वतंत्र स्कॉटलॅंडच्या विरोधात 1,877,252 मते मिळाली तर स्कॉटलँड स्वतंत्र व्हावा, याबाजूने 1,512,688 मते मिळाली. सुमारे 307 वर्षांपासून ग्रेट ब्रिटेनचा अविभाज्य भाग असलेले स्कॉटलँडसाठी 42 लाख लोकांच्या जनमताच्या आधारे निर्णय घेण्यात आला.
 
स्कॉटलॅंडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा, यासाठी 'यस' कॅम्पेन चालवणारे स्कॉटिश नॅशनल पक्षाचे नेते एलेक्स सॅलमंड यांनीही जनतेचा कौल मान्य केल्याचे सांगितले आहे.