शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बर्न , बुधवार, 27 मे 2015 (11:52 IST)

स्वीस बँकेत खाते असलेल्या तीन भारतीयांची नावे उघड

स्वीस बँकेत गुप्तपणे पैसा ठेवलेल ज खातेदारांची स्वीत्झर्लडमध्ये चौकशी सुरू आहे. त्यांची नावे उघड करण्याचा निर्णय   स्वीत्झर्लंड सरकारने घेतला असून, त्या अंतर्गत आणखी तीन भारतीयांची नावे मंगळवारी उघड करण्यात आली. त्यामध्ये उद्योगपती यश बिर्ला, गुरजितसिंग कोचर आणि रितिका शर्मा यांचा समावेश आहे.
 
यापूर्वी स्नेहलता साहनी व संगीता साहनी या दोन भारतीय महिलांची नावे उघड करण्यात आली आहेत. भारत सरकारने स्वीत्झर्लड सरकारकडे केलेल मागणीनुसार या सर्वाची नावे स्वीत्झर्लंड सरकारच्या गॅझेटमध्ये प्रसिध्द करण्यात आली. ‘स्वीस फेडरल टॅक्स अँडमिनिस्ट्रेशन’ने या खातेधारकांची काही माहिती या आधीच भारत सरकारकडे दिली आहे. भारतातील कर संकलन अधिकार्‍याकडून   चौकशी करता यावी, यासाठी या खातेधारकांची नावे उघड करण्यात आली आहेत.