बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (14:37 IST)

हलका फुलका इनक्युबेटर

मातेच्या गर्भाशयात नऊपेक्षा कमी महिन्यांचा कालावधी पूर्ण करू शकल्यामुळे जगात हजारो बाळांचा अकाली मृत्यू होतो. अशा वेळेआधीच जन्माला आलेल प्रीमॅच्युअर बाळांना वाचवण्यासाठी जेम्स रॉबर्ट या संशोधकाने इनफ्लेटेबल इनक्युबेटर बनवला आहे. नवजात बाळाच शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी बाजारात इतरही काही इनक्युबेटर्स उपलब्ध आहेत. ज्यात काही तासांकरिता तापमान नियंत्रित ठेवलं जाऊ शकतं. मात्र अकॉर्डियन वाद्यांप्रमाणे दोन्ही बाजूंनी उघडणार्‍या या कॉन्सर्टिना इनक्युबेटरमध्ये अजूनही काही सोयी आहेत. याच्या दोन्ही बाजूला लेड लाईटस्, टेम्परेचर प्रोब, सिरॅमिक हिटर, ह्युमिडीफायर व आर्देईनो कॉम्प्युटर बसवलेला आहे. मधल्या विस्तारणार्‍या भागात बाळासाठी छोटा बेड आहे. सुटसुटीत आकार असल्याने या अत्याधुनिक इनक्युबेटरची ने-आण करणंही सोपं आहे. तसंच तो छोट्या जागेतही सामावणं शक्य आहे. जेम्सनं सध्या प्रोध्योगिक तत्त्वावर हा इनक्युबेटर ब्रिटिश युनिव्हर्सिटीसाठी बनवला आहे. मोठ्या वैद्यकीय संस्थांनी याची व्यवसायिक निर्मिती करण्यासाठी पुढं यावं, असं त्याचं म्हणणं आहे.

सिरीयासारख्या कित्येक अविकसित देशांमध्ये अशी हजारो प्रीमॅच्युअर बाळं सुयोग्य इनक्युबेटिंग सुविधा नसल्यामुळे मृत्युमुखी पडतात. सिरियामधील प्रीमॅच्युअर बाळांची ही दुर्दशा पाहून जेम्सला हा इनक्युबेटर बनवण्याची कल्पना सुचली. अमेरिका, युरोपमधील प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक इनक्युबेटिंग तंत्रज्ञान वापरलं जातं. काही युद्धग्रस्त देशांमधील रेफ्युजी कॅम्पमध्ये हा इनक्युबेटर उपयोगी पडेल, अशी जेम्सला आशा आहे.

-