शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सना , सोमवार, 30 मार्च 2015 (11:36 IST)

हवाई हल्यात १५ सैनिक ठार

अरब आघाडीच्या हवाई हल्यात येमेनमध्ये १५ ठार झाले. येमेनच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बवर्षावात १५ बंडखोर समर्थक सैनिक मारले गेले. सौदीच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू झाल्यापासून प्रथमच धावपट्टीला लक्ष्य करण्यात आले आहे.
 
शिया बंडखोर व माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या समर्थक सैनिकांवर चौथ्या रात्री कारवाईदरम्यान सौदीच्या हल्ल्यांमुळे विमानतळाचे नुकसान झाले.