शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

हाताने भरवले म्हणून मुलांना केले आई-वडिलांपासून दूर !

आईवडील तीन वर्षांच्या अभिज्ञान आणि एक वर्षाच्या ऐश्वर्या सोबतच झोपतात, त्यांना हाताने भरवतात. पालकांची ही कृती मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहषल कसे कारण देत नॉर्वे सरकारने भारतीय वंशाच्या अनुरूप आणि सागरिक भट्टाचार्य यांच्या दोन्ही चिमुरड्यांना ताब्यात घेऊन सरकारी चाईल्ड केअर सर्व्हिस विभागाकडे सपोवले आहे.

याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नॉर्वे सरकारशी तब्बल दोनवेळा पत्रव्यवहार करून मुलांचा ताबा पालकांना मिळावा, अशी विनंती केली आहे, मात्र नॉर्वे सरकारने भारताची विनंती अद्याप मान्य केलेली नाही. भट्टाचार्य यांच्या मुलाचे शाळेतील वर्तन पाहून शिक्षकांना त्याचे संगोपन ‍नीट होत नसावे, असे वाटले. त्यानंतर 'चाईल्ड सर्व्हिस प्रोटेक्शन'चे कर्मचारी दर आठवड्याला तासाभरासाठी त्यांच्या घरी येऊ लागले. त्यावेळी त्यांनी ही मुले आई-वडिलांच्या बिछान्यात झोपतात. तसेच त्यांची आई त्यांना हाताने भरवते हे पाहिले. आणि त्यातून हे दाम्पत्य निष्काळजी आणि मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्याचा उफराटा ‍निष्कर्ष काढत मुलांना ताब्यात घेतले.