गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बर्लिन , मंगळवार, 31 मार्च 2015 (15:04 IST)

हो... तो मनोरुग्ण होता!

जर्मनविंग्ज विमानाच्या अपघातातास सहवैमानिक आंद्रे लुबित्झ हाच कारणीभूत असल्याची शक्यता अधिक गडद झाली असून तो नैराश्यग्रस्त, मनोरुग्ण असल्याचे त्याच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले. नैराश्य आणि मानसिक भीतीतून बळावलेल्या विकृतीमुळे तो हिंसक व्हायचा.
 
त्यामुळे २००९ मध्ये त्याला वैमानिक प्रशिक्षण मध्यंतरीच सोडावे लागले होते. तो दृष्टिदोषावर उपचारही घेत होता, असे तपास अधिकाºयांनी सांगितले. त्याचा दृष्टिदोष किती गंभीर होता, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या दृष्टिदोषामुळेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असावी, असे एका तपास अधिकार्‍याचा कयास आहे. एकूणच त्याच्या घराच्या झडतीत आढळलेल्या कागदावरून तो आजारावर उपचार घेत असल्याचे दिसते.