मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कराची , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:30 IST)

हो.. दहशतवाद्यांना पाककडूनच प्रशिक्षण : मुशर्रफ

पाकिस्तानची गुप्तचर संस्था असणार्‍या आयएसआयकडूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.
 
लष्करे तैयबा आणि जैशे महंम
दच्या दहशतवाद्यांना आयएसआयकडूनच प्रशिक्षण दिले जात असून काश्मीरचा तिढा सुटत नाही तोवर भारतावर हल्ले होतच राहतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. काश्मीरबाबत अद्यापही पाकिस्तानी नागरिकांच्या मनात संवेदनशील भावना असल्याने हा मुद्दा वगळता केलेल्या सर्व शांतता चर्चा निष्फळ आहेत, असेही ते म्हणाले.