शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 2 मे 2015 (11:19 IST)

‘मॅसेंजर’चा बुधावरच ‘द एन्ड’

‘मॅसेंजर’ हे नासाचे अंतराळ यान बुध ग्रहाला धडकले. यामुळे सुमारे अकारा वर्षांपासून  सुरू असलेल्या अंतराळ मोहीमेचा ‘द एन्ड’ झाला आहे.

३ आॅगस्ट २००४ रोजी मॅसेंजरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. बुधाच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर महत्वाची माहिती व छायाचित्रे मिळाली होती. 

प्राथमिक टप्पा यशस्वी झाल्यानंतर या मोहिमेचा विस्तार करण्यात आला. तेव्हा तर या यानाने ग्रहाच्या अगदी जवळून पृष्ठभागापासून केवळ ५ ते ३५ किमी उंचीवर काम केले. अंतिम संशोधनही पूर्ण झाले मात्र, अखेर ते धडकल्याने पुढील टप्याला ‘खो’ बसला आहे.