Widgets Magazine
Widgets Magazine

धोनीच्या चाहत्यांनी हर्ष गोयंकाला फटकारले

रायजिंग पुणे सुपरजाएंटचे मालक संजीव गोयंकाचे भाऊ हर्ष गोयंका याला धोनीच्या चाहत्यांनी चांगलेच फटकारले. त्यांनी ट्विटरवरकर्णधार स्टिव्ह स्मिथचे कौतुक करत तर धोनीच्या नेतृत्वावर व फलंदाजीवर टीका केली आहे. गोयंकाने  ट्‌वीट करून म्हणाले की, महेंद्र सिंह धोनीच्या जागी स्टीव स्मिथकडे रायजिंग पुणे सुपरजाएंट संघाचे नेतृत्व सोपविण्याचा आमचा निर्णय खूपच योग्य होता. स्मिथने सिद्ध केले आहे की, जंगलचा राजा कोण आहे. आपल्या लाजवाब प्रदर्शनाने त्याने धोनीपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.’ यानंतर गोयंकाने लगेच ट्विट डिलीट केले. मात्र यामुळे धोनीच्या चाहत्यांनी त्याला फटकारले आहे. Widgets Magazine

यावर अधिक वाचा :