गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आज मुंबई-राजस्थान झुंज

WD
सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना हा यजमान मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन तुल्बळ संघात बुधवार 15 मे रोजी खेळला जात आहे.

पोलार्डच 27 चेंडूंवरील 8 षटकार 2 चौकारांसह नाबाद 66 धावांच्या झंझावाताने मुंबईला सनराझर्स हैदराबादविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून दिला. 1 मे रोजी खेळल्या गेलेल्या हैदराबाद येथील साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईचा 7 गडी राखून पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड मुंबईने केली. या विजासह मुंबईने साखळी गुणतक्त्यात 20 गुणांसह अव्वलस्थान घेतले आहे. राजस्थानचा संघसुद्धा 20 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. धावगती सरस ठेवल्यामुळे मुहबई पहिला, चेन्नई दुसरा व राजस्थान तिसर्‍या स्थानांवर आहेत.

हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असा आहे. या तीनही संघाने प्ले ऑफ फेरी निश्चित केलेली आहे. परंतु, अव्वलस्थान मिळविण्यासाठी विजय दोघांनाही महत्त्वाचा आहे. यापूर्वी, या दोन संघात 17 एप्रिल रोजी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईला 87 धावांनी नमविले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी मुंबईला मिळाली आहे. मुंबईने घरच्या मैदानावर सात सामने खेळले असून सातही सामने जिंकले आहेत. त्यामुळे, हाही सामना मुंबई जिंकेल, अशी अपेक्षा आहे.

दोन्ही संघ समसमान असे आहेत. मुंबईकडे पोलार्ड असला तर राजस्थानकडे शेन वॅटसन आहे. शेन वॅटसनने 34 चेंडूंत नाबाद 70 धावा करून राजस्थानला चेन्नईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळवून दिला होता. राजस्थानविरुद्ध मुंबईने 18.2 षटकात सर्वबाद 92 अशी नीचांकी धावसंख्या केली होती. याउलट, चेन्नईचे 179 धावांचे आव्हान अजिंक्य राहाणे व शेन वॅटसन यांनी पार केले होते. वॅटसनने तर यापुढे जाऊन मुंबईला कसे पराभूत करावे, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे, असे सांगितले आहे. तर वॅटसन हा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे, असे कर्णधार राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे. त्याळे, हा सामना रंगतदार व अटीतटीचा ठरेल, असे वाटते.