गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर सनसनाटी विजय

WD
मिशेल जॉन्सन, प्रगन ओझा यांची भेदक गोलंदाजी आणि रोहित शर्मा-हरभजनची 57 धावांची भागीदारी याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सहाव्या आपीएल ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 60 धावांनी दारुण पराभव केला.

या विजासह मुंबईने प्ले ऑफ फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल आहेत. विजासाठी 140 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 15.2 षटकात सर्वबाद 79 धावा करू शकला. काल दिल्ली संघाने हैदराबादविरुध्द सर्वबाद 80 धावा केल होत. साखळी गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेला चेन्नई संघाची या आपीएलमधील नीचांकी धावसंख्या ठरली.

मिशेल जॉन्सनने मुरली विजय (2) याचा त्रिफळा घेतला. तनंतर त्याने सुरेश रैना आणि एस. बद्रीनाथ यांना शून्यावर टिपले. त्याने एका षटकात या तीन फलंदाजांना बाद केल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत आला. माईक हसीला पोलार्डने तीन वेळा जीवदान दिले. सुयाल डावखुर्‍या मध्यमगती गोलंदाजाने ड्वेन ब्राव्होला 9 धावांवर टिपले. अश्विन हा हरभजनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्नात त्रिफळाचित ठरला. डावखुर्‍या प्रग्यान ओझाने चेन्नईला मोठे दोन धक्के दिले. त्याने माईक हसीला (22) व कर्णधार धोनीला (10) टिपले. मलिंगाने ख्रिस मॉरीसचा (1) त्रिफळा तर त्यानेच रोहित शर्माला शून्यावर बाद केले. चेन्नईची स्थिती 9 बाद 54 अशी झाली. रवींद्र जडेजाने जॉन्सनच एका षटकात 20 धावा वसूल केल. ओझाने त्याला बाद करून मुंबईच्या विजावर शिक्काबोर्तब केले. मुंबईकडून जॉन्सनने 27 धावांत 3, ओझाने 11 धावांत 3, मलिंगाने 6 धावांत 2 तर सुयाल, हरभजन यांनी एकेक गडी टिपला.

कर्णधार रोहित शर्मा आणि हरभजनसिंग या दोघांनी सहाव्या जोडीस 29 चेंडूवर नाबाद 57 धावांची भागीदारी करून मुंबईच्या अडचणीत आलेला डाव सावरला. या दोघांमुळे मुंबईने 5 बाद 139 धावापर्यंत मजल मारली. रोहितने 30 चेंडूवर 3 चौकार 1 षटकारास नाबाद 39 तर हरभजनने 11 चेंडूत 2 चौकार 2 षटकारासह नाबाद 25 धावा काढल्या. या दोघांनी लाफलिनच्या शेवटच्या दोन षटकात 32 धावा जोडल्या.

रोहित शर्माने वानखेडेवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. धोनीने गोलंदाजीचे खाते उघडणसाठी फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू दिला व त्याने 29 धावांत 3 गडी बाद केले. आघाडीच फलंदाजाला टिपल्यामुळे धावगतीला ब्रेक लागला. दिनेश कार्तिकने जडेजाच्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार अशा 14 धावा घेतल परंतु उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो 23 धावा काढून बाद झाला. तत्पूर्वी जडेजाने तेंडुलकरला (15) टिपले. ड्वेन ब्राव्होने ड्वेन स्मिथला (22) टिपले. पोलार्ड याच्या झेल लॉगऑन सीमारेषेवर सुरेश रैनाने घेतला. त्याला फलंदाजीत बढती देण्यात आली परंतु तो जडेजाच्या चेंडूवर एक धाव काढून परतला.

चेन्नईने अल्बी ङ्कोरकेल आणि रिद्दीमान साहा या जायबंदी खेळाडूंऐवजी बेन लाफलिन, मुरली विजय यांना संधी दिली. मुंबईने दुखापत झालेल्या धवल कुलकर्णी याच्या जागी पवन सुयालला संधी दिली.