शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

मुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’

WD
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सहाव्या सत्रातील ३७व्या सामन्यात आज शनिवारी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियंससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुर राहील.

मुंबई इंडियंसने आतापर्यंत सात सामने खेळले. चारमध्ये त्याला विजय मिळाला, तर तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या मागील सामन्यात मुंबईने कोलकाता नाइट रायडर्सला त्याच्या घरात मात दिली होती.दुसरीकडे स्पर्धेतील प्रबळ दावेदार रॉयल चॅलेंजर्सने आतापर्यंत आठ सामने खेळले. सहा विजय आणि दोन पराभवासह तो मुख्यस्थानी आहे. आपल्या गत सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने पुणे वॉरियर्सचा दारूण पराभव केला होता. क्रिस गेलने या सामन्यात विक्रमी नाबाद १७५ धावांची खेळी केली होती.

फलंदाजीसाठी अनुकूल वानखेडेच्या खेळपट्टीवर मुंबईसमोर गेलचा सामना करण्याचे आव्हान राहील. एकट्याच्या बळावर सामना जिंकण्याची क्षमता असणा-या गेलला मुंबई संघाची लवकर बाद करण्याची इच्छा राहील. कर्णधार विराट कोहली देखील चांगल्या लयात आहे. सर्वात जास्त धावा बनवण्याच्या यादीत गेल व कोहली मुख्य पाच खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. अब्राहम डिविलियर्स आणि तिलकरत्ने दिलशान देखील मोठे शॉट लावण्यात माहिर आहे. मुंबईच्या फलंदाजांनी स्पर्धेच चांगले प्रदर्शन केले. दिनेश कार्तिक व रोहित शर्मा चांगल्या लयात आहे. कीरन पोलार्डने सुरवातच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते परंतु आताच्या काही सामन्यात तो धावू बनवू शकला नाही. ड्वेन स्मिथ संघात समाविष्ट झाल्याने संघातील फलंदाजी क्रमाला आणखी बळ मिळाले.गोलंदाजीत मुंबईचा लसिथ मलिंगा, मिशेल जॉनसनने काही सामन्यात चांगली गोलंदाजी केली परंतु हे सतत चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी राहिले.दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांचे प्रदर्शनही मिळतेजुळते राहिले. रॉयल चॅलेंजर्सने आपल्या गोलंदाजीच्या बळावर कमीच सामने जिंकले. फलंदाजीसाठी अनुकुल या खेळपट्टीवर एक मोठा स्कोर व रोमांचक सामना होण्याची अपेक्षा आहे.

जयपूर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सहाव्या सत्रातील ३६व्या सामन्यात उद्या शनिवारी सवाई मान सिंह स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायजर्स हैद्राबादशी होईल.

राजस्थानने आतापर्यंत सात सामने खेळले. चार विजय आणि तीन पराभवासह राजस्थान रॉयल्स गुण यादीत मुख्य चारमध्ये आहे. आपल्या गत सामन्यात राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्सद्वारे पराजयाचा सामना करावा लागला होता.दुसरीकडे सनरायजर्सने आतापर्यंत आठ सामने खेळले. पाच विजय आणि तीन पराभवासह तो गुण यादीत मुख्य चार मध्ये समाविष्ट आहे. सनरायजर्सला आपल्या मागील सामन्यात सुपर किंग्सने पराभव मिळाला होता.

दोन्ही संघासाठी हा सामना खुप महत्त्वपूर्ण आहे. सनरायजर्स संघ राजस्थान रॉयल्सला पराभूत करून आगामी सामन्यात प्रवेश करण्याकडे आणखी एक पाऊल वाढवू इच्छित असेल दुसरीकडे राजस्थान रॉयल्सही विजय प्राप्त करून आपली स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न करेल.राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. राहुल द्रवीड अजिंक्य रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नीने आपल्या चांगल्या फलंदाजीमुळे संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिले. संघाचा स्टार फलंदाज शेन वॉटसनही लयात परतला आहे. गत सामन्यात त्याने या सत्राचे पहिले शतक ठोकले होते परंतु त्याच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.दुसरीकडे स्पर्धा सुरू झाल्यापासून फलंदाजीत सघर्ष करीत असलेल्या सनरायजर्ससाठी स्टार फलंदाज शिखर धवन दुखापतीतून उभरून संघात समाविष्ट झाला ही दिलासापूर्ण गोष्ट आहे. धवनने आज गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध नाबाद ६३ धावांची खेळी खेळली. तो आल्यामुळे संघातील फलंदाजी क्रमाला बळ मिळेल. परंतु इतर फलंदाज कॅमरन व्हाइट, कुमार संगकारा आणि पार्थिव पटेलचे चांगले प्रदर्शन न करणे संघासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे.गोलंदाजीत डेल स्टेनच्या नेतृत्वात सनरायजर्सचे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. अमित मिश्रा सर्वात जास्त बळी घेण्याबाबत दुस-या स्थानावर आहे. इशांत शर्मानेही आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीत कोणतेही मोठे नाव नाही परंतु केवन कपूर, शांताकुमारन श्रीसंत आणि शॉन टेटने तुकडीत चांगले प्रदर्शन केले. राजस्थान रॉयल्सला त्याच्या घरात पराभूत करणे सनरायजर्ससाठी सोपे राहणार नाही.