शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

मुंबई, बेंगळुरूची नजर विजयी सुरुवातीवर

WD
इंडियन प्रीमिअर लीगच्या सहव्या सत्रातील दुसर्‍या सामन्यात आज मुंबई येथे इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झुंज होणार आहे. दोन्हीसंघात कमालीची क्षमता आहे परंतु महत्वाच्या सामन्यात ढेपाळण्याचा लौकिक त्यांनी कायम राखला आहे.

बलाढ्य मुंबई संघाने चॅम्पीयन्स लिग टी-२० स्पर्धा जिंकली आहे शिवाय आयपीएलमध्ये ते एकदा उपविजेते आणि दोन वेळा उपांत्य फेरीही गाठली होती. यंदा मुंबईचे नेतृत्व रिकी पॉन्टींगकडे आहे. अंबाती रायुडू आणि रोहित शर्मा गतवर्षीचा फॉर्म दाखवण्यास उत्सुक आहेत. त्यांनी अनुक्रमे ३३३ आणि ४३३ धावा काढल्या होत्या. वरिष्ठ फलंदाज सचिन तेंडुलकर, ड्वेन स्मिथ, केरॉन पोलार्ड हे अष्टपैलू तसेच अब्जाधीश ग्लेन मॅक्सवेल मुळे मुंबई संघ बलाढ्य बनला आहे. किवीज खेळाडू जेकब ओरमही मुंबईच्या दिमतीला आहे. दिनेश कार्तिकमुळे मधली फळी समृध्द बनली आहे. गोलंदाजीचा भार वाहण्यास लसिथ मलिंगा, ओझा आणि मुनाफ पटेल तयार आहेत. आसीबीचे नेतृत्व युवा खेळाडू विराट कोहली करणार आहे. ख्रिस गेल, तिलकरत्ने दिलशान, ए.बी.डिव्हीलर्स हे अफाट क्षमतेचे खेळाडू बंगलोर संघात आहेत. गेल मध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. एबी अनपेक्षित फटके मारण्यासाठी प्रसिध्द आहे. गोलंदाजीत मात्र बंगलोर संघ कमकुवत वाटतो. झहीर खान अजुनही फिट नाही. नवा चेंडू अभिमन्यू मिथून आणि विनय कुमारला सांभाळावा लागेल. विंडीजचा रवी रामपॉलही दिमतीला आहे.फिरकी विभाग मुथैय्या मुरलीधरन, डॅनिएल वेटोरी आणि मुरली कार्तिक सांभाळतील. जालन्याच्या विजय झोलचा या संघात समावेश आहे.