testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चेन्नई फायनलमध्ये

virat kohali
नवी दिल्ली | वेबदुनिया|
WD
फेरोजशहा कोटला मैदानावर मुंबई इंडियन्सचा ४८ धावांनी पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रूबाबात प्रवेश केला. शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चेन्नईने हे यश मिळवले. चेन्नईच्या तुलनेत मुंबईच्या फलंदाजी फिकी पडले. सलामीवीर ड्वेन स्मिथच्या तुफानी ६८ धावा वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. मायकेल हसी सामनावीर ठरला.

१९३ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगला प्रारंभ मिळाला नाही. तारे अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि कार्तिकने दुस-या विकेटसाठी ७५धावांची तुफानी भागीदारी केली. यात स्मिथचा वाटा मोठा होता. स्मिथने केवळ २८ चेंडूत ६८ धावांचा पाऊस पाडताना ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजीचे अक्षरश: धिंडवडे उडाले. एकही मोठी भागीदार झाली नाही. कार्तिक ११ धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर परतला. तर ज्याच्यावर खूप आशा होत्या तो केरॉन पोलार्ड २४ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार ठोकले. रायडू -१५, हरभजन -०, जॉन्सन - ६. आणि त्यानंतर ३ भोपळे अशी धावसंख्या निघाली. मुंबईच्या घसरगुंडीस प्रारंभ केला तो रवींद्र जडेजाने त्याने ३१ धावांत ३ बळी घेतले. त्यावर शेवटचा हात फिरवताना ब्राव्होने ९ धावांत ३ बळी घेतले. आयपीएल स्पर्धेत पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सविरूद्ध १ बाद १९२ अशी दणदणीत धावसंख्या उभी केली ती माईक हसी आणि सुरेश रैनाच्या जंगी खेळ्यांच्या जोरावर. दोघांनीही नाबाद अर्धशतके फडकावली. हसीने ५८ चेंडूत ८६ तर रैनाने ४२ चेंडूत ८२ धावा काढल्या.
टॉस धोनीने जिंकला आणि फलंदाजी घेतली. हसी- मुरली विजयने ४४ चेंडूत ५२ धावांची सलामी दिली. २० चेंडूत २३ धावा काढणारा विजय पोलार्डच्या चेंडूवर स्मिथद्वारा झेलबाद झाला. हसी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने एका बाजूने धावा झोडपणे सुरूच ठेवले. हसीने ४० चेंडूत अर्धशतक काढताना ७ चौकार ठोकले. रैनाने हसीला सुरेख साथ दिली. त्याने प्रारंभापासूनच षटकारांचा भडीमार सुरू केला. रैनाने केवळ २९ चेंडूत अर्धशतक ठोकताना २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. चेन्नईच्या १०० धावा ७६ चेंडूत तर दीडशे धावा १०१ चेंडूत पूर्ण झाल्या. या जोडीने ७६ चेंडूत १४० धावांची भर टाकली. मुंबईच्या जॉन्सन, मुनाफ पटेल, मलिंगा आणि ओझाला खरपूस मार मिळाला. जॉन्सनने ४०, पटेलने ३ षटकांत ३२, मलिंगाने ४५ तर ओझाने २ घटकांत २० धावा दिल्या. रैनाने प्रत्येकी ५ चौकार आणि षटकार ठोकले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वीज बिल भरण्याची सक्ती ...

national news
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कृषीपंपाचे ...

‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? - सामना

national news
दैनिक सामना अर्थात शिवसेना पक्षाचे मुखपत्र असललेल्या वृत्तपत्राने पाकवर जोरदार टीका केली ...

सर्वोच्च न्यायालयचा महत्वपूर्ण निर्णय : शालेय प्रवेशासाठी ...

national news
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावत असताना म्हटलं आहे की, सीबीएसई, नीट आणि यूजीसी ...

मोबाइलवरील खासगी अ‍ॅप गायब करायचे असेल तर हे करा ...

national news
आपल्या मोबाइलमध्ये असे काही गोपनीय फोटो, फाइल्स असतात ज्या दुसर्‍यांना दिसल्यास गहजब उडू ...

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : पवार

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा सातार्‍यात चांगलीच ...