गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन गोत्यात

WD
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपरकिंग्जचे प्रमुख गुरुनाथ मय्यपन यांच्यावर फिक्सिंगसंबंधी आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याने ते मुंबईत हजर झाले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे श्रीनिवासन अडचणीत आले आहेत.

विशेष म्हणजे श्रीनिवासन यांचे चिरंजीव अश्विन यांनी आपल्या वडिलांसह मेहुणा मय्यपन यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आयपीएलच्या अगोदरपासून मय्यपन यांचे सट्टेबाजांशी संबंध आहेत, असे म्हटले आहे. वडीलदेखील दुबईत कोणासोबत गोल्फ खेळत होते, एवढेच नव्हे, तर वडिलांनी लहान विमान का खरेदी केले, विदेशात

जाताना चार तासासाठी ते नेहमीच दुबईत थांबतात, याची चौकशी व्हावी, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हा आरोपांचा भडिमार आणि मय्यपन यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पाश्र्वभूमीवरच बीसीसीआयने मंथन सुरू केले आहे. गरज पडल्यास त्यांना पदही सोडावे लागू शकते, असे बीसीसीआयच्याच वतीने सांगण्यात आले.