गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|

'आयफोन'ची कॉपी केल्याने 'सॅमसंग'ला दंड!

WD
साउथ कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अ‍ॅपलच्या आयफोनचे पेटेंट कॉपी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सॅमसंगला अमेरिकन ज्यूरीने 290 दशलक्ष डॉलर्सचा (जवळपास 1823 कोटी रूपये) दंड ठोठावण्यात आला आहे.

सॅमसंगने आयफोनमधील काही सुविधांची कॉपी केल्याचा अ‍ॅपलने केला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टात गेल्यावर्षीच सॅमसंगने आयफोनची कॉपी केल्याचे कबुल केले होते. अ‍ॅपलने नुकसान भरपाई म्हणून 379.8 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याची मागणी केली होती. तर सॅमसंगने फक्त 52.7 दशलक्ष डॉलर्स देण्याची तयारी दाखवली होती.

सॅमसंग आणि अ‍ॅपलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात लढा सुरू आहे. सॅमसंगने आयफोनमधील स्क्रीनवर बोटे फिरवून झूम इन किंवा झू आऊट करण्याचे फीचर हे आयफोनमधून कॉपी केल्याचा तसेच आयफोनसारखा फ्लॅट ब्लॅक स्क्रीनही सॅमसंगने चोरी केल्याचा अ‍ॅपलने दावा केला होता.

सॅमसंगने अ‍ॅपलला द्यावयाची नुकसान भरपाई ही 290 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1823 कोटी रूपयांवर आणली आहे. म्हणजे अ‍ॅपलला आता सॅमसंगकडून आधीचे 640 दशलक्ष डॉलर्स आणि नव्याने मंजूर झालेले 290 दशलक्ष डॉलर्स असे मिळून 929.8 दशलक्ष डॉलर्स सॅमसंगकडून मिळणार आहेत.